FSSAI ने म्हणजेच Food Safety Standards Authority of India ने पाण्याच्या बाटल्यांसाठी नव्या गाईडलाईन्स तयार केल्या आहेत , यामुळे आता सर्व कंपन्यांची पॅकेज्ड पाणी तयार करण्याची पद्धत बदलणार आहे.
FSSAI च्या नव्या गाईडलाईननंतर पॅकेज्ड पाणी तयार करणाऱ्या कंपन्यांना एक लीटर पाण्याच्या बाटलीत २० मिलीग्रॅम कॅल्शियम आणि १० मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकत्र करावे लागेल.
पाणी सुरक्षित करण्यासाठी तसेच फिल्टर करण्यासाठीच्या प्रक्रियेत मिनरल्स काढणे आवश्यक असते , मात्र आता ते ग्राहकांच्या फायद्यासाठी पुन्हा टाकले जावेत असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान हा आदेश लागू करण्यासाठी कंपन्यांना दोन वेळा ,वेळ मागितला होता , मात्र आता हा आदेश लागू करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर २०२० ची डेडलाईन निश्चित केली आहे.
0 Comments