'आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचेय' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना


 मुंबई/प्रतिनिधी:

 राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेसोबतच्या महाविकास आघाडीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, 'आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. परंतु आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या.' अशा स्पष्ट सूचना पवार यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या.

(Advertise)

पराभूत उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments