युजवेंद्र चहल- धनश्रीच्या साखरपुड्याचे फोटो....


या जोडीनं त्यांच्या साखरपुडा समारंभातील अर्थात Engagement Ceremonyचे फोटोही सर्वांच्या भेटीला आणले आहेत.


युजीची युट्यूबर पत्नी धनश्री वर्मा ही या फोटोमध्ये अतिशय सुरेख, जणू एखाद्या राजकुमारीप्रमाणं दिसत आहे. 

एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यावर शिक्कामोर्तब करणारी ही जोडी आणि त्यांचे हे फोटो सध्या कमालीचे व्हायरल होत आहेत.


यंदाच्याच वर्षी या दोघांची रिंग सेरेमनी पार पडली होती, ज्याची माहिती युजीनंही दिली होती.


युजवेंद्र आणि धनश्रीच्या विवाह आणि साखरपुडा समारंभातील हे क्षण पाहता ही जोडी सर्वांच्याच मनात घर करत आहे, असं म्हणायला हरकत नाही.


भारतीय क्रिकेट संघात युजवेंद्रनं त्याच्या कामगिरीच्या बळावर फार कमी वेळातच लोकप्रियता मिळवली आहे. तर, त्याची पत्नी हीसुद्धा युट्यूब क्षेत्रात तिची वेगळी ओळख प्रस्थापित करुन यशस्वी आहे.

 धनश्री आणि युजवेंद्र हे दोघंही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळं या वर्तुळात त्यांना नेटकऱ्यांची सतत पसंती मिळते.

Post a Comment

0 Comments