✒️संतोष शिंदे, कोल्हापूर
कोणी म्हणे ...भाऊ ..
कोणी पाय धरते...
निवडणूकित लोक..
गावात पच्याड्या मारते..
चावडी वर गेलं..
तेथे उमेदवार दिसतो ..
निवडणूकीच्या वेळी
चावडीवरच दात घासतो
मने काही झालं तरी..
विजय पक्काच हाय..
विजयी उमेदवाराचा
मले शिक्काच हाय...
आता इटून गेलं ...
यायचं राजकारण पाहून
दुसरे निवडून आले..
आन हेच गेलं राहून ...
मत देलं नाही म्हणून
लोकाईसंग आटलं...
पुरतं कंगाल झालं ..
त्याने मस्तक पेटलं...
घर दार सांभाळून ..
निवडणूक करा....
नाहीत सगळं बरबाद ,
नुसता खा लागलं वारा....
0 Comments