भाजपचे १० नाराज आमदार राष्ट्रवादीत येणार ? - जलसंपदामंत्री जयंत पाटील


मुंबई - 'भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज आहेत, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

(Advertise)

मागील काही दिवस अनेक कार्यकर्ते चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल दिसतो आहे, याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

(Advertise)

तसेच, त्यांनी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी दिलेल्या निर्णयावर भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, स्थगिती दिलेली असली तरी अंतिम सुनावणी अद्याप बाकी आहे. आरेच्या भागात वनक्षेत्र आहे, त्यात वनविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही. मुंबईच्या जवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरण हानी होते, सरकारने भूमिका घेतली त्यावर इतके आकांततांडव करण्याची गरजच काय? राजकीय हितासाठी काही जण राजकारण करत आहेत, अशी टीकाही जयंत पाटीलांनी केली.

Post a Comment

0 Comments