....अखेर रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक



मुंबई | रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक करण्यात आली. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार , त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचा सांगण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments