आमदार संजय मामा शिंदे यांचे करमाळा मतदार संघातील उजनी धरणग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना लोक नम्र आवाहन...



सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणासाठी आपण आपल्या जमीनी दिल्या. त्यामुळे प्रत्यक्षात २७ सप्टेंबर १९८० साली उजनी धरण अस्तित्वात येऊ शकले याची सर्वांना कल्पना आहे. २७ सप्टेंबर २०२० रोजी या धरणाला ४० वर्षे पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात या धरणाचे कामकाज १९६९ साली सुरू झाले. म्हणजेच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी १९७० च्या आसपास संपादित करण्यास सुरुवात झाली.
(Advertise)
११  वर्षे धरणाचे कामकाज चालले, आणि १९८० साली ते पूर्ण झाले असा उजनी धरणाचा इतिहास आहे. या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सोलापूरसह  ,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील  लोकांच्या जीवनमानात झालेला आमूलाग्र  बदल आपण सर्वच पाहत आहोत. असे असले तरी दुसरीकडे मात्र काही जणांचे पुनर्वसनाचे , पर्यायी जमिनींचे प्रश्न मात्र अद्यापही प्रलंबित आहेत.
(Advertise)
        
जवळपास ५० वर्षांपूर्वी माझ्या करमाळा मतदार संघातील २०-२२  गावातील लोकांच्या जमिनी या उजनी धरणासाठी संपादित केल्या गेल्या. आज ५० वर्षे उलटली गेली तरी या पुनर्वसित लोकांचे प्रश्न आजही कायम आहेत. अनेक लोकांना पर्यायी जमिनी प्रत्यक्षात मिळाल्याच नाहीत ...पुनर्वसित गावठाणाचे , त्यांच्या रस्त्यांचे प्रश्नही रखडलेले आहेत ...  
            (Advertise)
  "आधी पुनर्वसन मग धरण "
     
हे शासनाचे धोरण असताना आजही पन्नास वर्षांनंतर माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत या गोष्टीची खंत वाटते...
   
(Advertise)
त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्त भागातील शेतकऱ्यांची त्यांच्या अडचणींची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे या  भागातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की , पुनर्वसन संदर्भातले आपले  प्रश्न,अडचणी असतील  तर त्या अडचणी संदर्भात आपण ३० नोव्हेंबर २०२० पूर्वी करमाळा येथील विठ्ठल निवास या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे शासनस्तरावरती हे प्रश्न सोडवताना आपल्याकडून मिळालेल्या माहितीची निश्चितच मदत होईल..
आपला
आ.संजयमामा शिंदे
( विधानसभा सदस्य  करमाळा -माढा)

 संपर्कासाठी पत्ता...
 विठ्ठल निवास (आ. संजयमामा शिंदे निवासस्थान)
करमाळा- नगर बायपास रोड , अक्षय हॉटेल च्या पाठीमागे. 
 डॉ- विकास वीर - मो. नं- ९९२२८१६६५५/ ७७७४०३४५५५

Post a Comment

0 Comments