"सरकारमध्ये नाराजी आहे ; पण"…. - संजय राऊत


 तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे, पण तरीही सरकार टिकेल,’ असा ठाम विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 
(Advertise)

शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती’, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना रोखठोक’ या सदरात म्हटलं आहे.

 त्याचबरोबर, विरोधकांकडून घेतले जाणारे आक्षेप व केल्या जाणाऱ्या भाकितांचाही त्यांनी समाचार घेतला आहे.
(Advertise)

 ‘महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments