व्हॉट्सअॅपमध्ये झाला ६१ नव्या वॉलपेपरचा समावेश


व्हॉट्सअॅपने नेहमीप्रमाणे अॅप अपग्रेड केले असून नव्या ६१ वॉलपेपर्सचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे चॅटिंग करताना युजर्सना वेगळाच अनुभव मिळू शकणार आहे. 
(Advertise)

असे निवडा वॉलपेपर्स
(Advertise)

युजर्स ३२ नवे ब्राइट वॉलपेपर्स, २९ नवे डार्क वॉलपेपर्स, कस्टम वॉलपेपर आणि सॉलिड कलरमध्ये आपल्या हिशोबाने निवडू शकतात. जर आपण जुना वॉल पेपर निवडला तर आपण व्हॉट्सअॅप अर्काईव्ह हा पर्याय निवडू शकता. आपण जर सॉलिड रंगांना नव्या वॉलपेपरप्रमाणे सेट करु इच्छित असाल तर आपण याला व्हॉट्सअॅप डुडलवर घेऊ शकता.
(Advertise)

सध्या आपल्या बीटा युजर्ससाठी हे वॉलपेपर फिचर व्हॉट्सअॅपने आणले आहे. लवकरच त्याचे स्टेबल व्हर्जन सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments