भारतीय नाथ समाज नाथ संघटना नाशिक जिल्हा पदाधिकारी मेळावा संपन्न

 
अखिल भारतीय नाथ समाज नाथ संघटना जिल्हा नाशिक. रविवार दि. ०८ रोजी यशांतिका हाॅल याचे प्रथम उदघाटन मा.श्री. निखिल जाधव  साहेब याचे हस्ते उदघाटन करण्यात आले.सिन्नर येथे नाशिक जिल्हा नाथ संघटनेची  पदाधिकारीनी जनरल मिटींग चे आयोजन केले. सदरहु मिटींग चे अध्यक्ष स्थान मा.श्री. निखिल बाबाजीनाथ जाधव. राष्ट्रीय युवा नेते नाथ सेना यांच्या हस्ते श्री. गुरू गोरक्षनाथ प्रतिमा पूजन. दिप पूजन व कु.अंकिता विजय शिंदे हिने स्वागत गीत सादर केले. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर लाड सरचिटणीस यांनी संघटनेचे उद्दिष्ट,तत्व, विचारधारा व संघटना कोणत्या उद्दिष्टयाने केली याविषयी माहिती व प्रस्तावना करण्यात आली.  त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे सत्कार व नाशिक जिल्हा निवड झालेले पदाधिकारी यांना नियुक्त पत्र अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले.
 त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने मिटींग वरील विषयाबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये 1) दि.18.10.2020 रोजी झालेल्या ऑनलाईन मिटींग बद्दल माहिती देण्यात आली. 2) सन 2021 साल .नाशिक जिल्हातील नाथ संघटना दिनदर्शिका तयार करणे बाबत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला.3) सिन्नर येथील श्री. गुरू गोरक्षनाथ मंदिर  परिसर येथे समाजाच्या रिकाम्या  जागेवर समाज मंदिर/ सभा मंडप तसेच वाल कंपाऊड भिंत व नदिच्या बाजुने असलेले पुर नियंत्रण भिंतीचे काम मा.खासदार श्री. हेमंत आप्पा गोडसे साहेब तसेच सिन्नरचे आमदार  श्री. माणिकराव कोकाटे साहेब यांच्याकडे सदरहु  कामाचे निवेदन तयार करून मंजुरी साठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. 
तसेच मिटींग साठी उपस्थित मा.श्री. निखिल जाधव साहेब याचा सत्कार श्री. अशोक शिंदे.(म.रा.कार्याध्यक्ष) यांनी केला.श्री. शिवाजी सुर्यवंशी (म.रा.उपाध्यक्ष ) यांचा सत्कार श्री. विजय शिंदे यांनी केला. श्री. मधुकर शिंदे (उपाध्यक्ष. शिक्षक नाथ सेना ) याचा सत्कार श्री. मिनाथ लेवे यानी केला. श्री चंद्रकांत शिंदे (नगर जिल्हा उपाध्यक्ष ) याचा सत्कार श्री. सुरेश लाड यांनी  केला. श्री. मच्छिंद्र हिंगमिरे (उत्तरमहाराष्ट्र उपाध्यक्ष ) याचा सत्कार श्री आकाश जाधव यांनी केला. श्री. सोमनाथ चव्हाण (संगमनेर तालुका अध्यक्ष )याचा सत्कार श्री अरविंद सूर्यवंशी यांनी केला. श्री. मच्छिद्र चव्हाण (शहरप्रमुख अहमदनगर) याचा सत्कार श्री ज्ञानेश्वर लाड यांनी केला. श्री. मनोहर शिंदे सल्लागार नाशिक याचा सत्कार श्री रविंद्र शिंदे यांनी केला. तसेच सौ.पल्लवी वायफळकर .महिला अध्यक्ष नाशिक याचा सत्कार सौ.छाया शिंदे व सौ.रुपाली शिंदे यांनी केला. तसेच श्री. निखिल जाधव साहेब यानी नाशिक जिल्हा नवनियुक्त नाशिक शहर व नाशिक ग्रामीण मधील सल्लागार पदी निवड झालेल्या व सर्व पदाधिकारी यांना नियुक्त पत्र व सत्कार करुन गौरवण्यात आले. वरील मिटींगच्या वेळी श्री. अशोक शिंदे, श्री. मनोहर शिंदे, श्री. ज्ञानेश्वर लाड, श्री. विजय शिंदे,श्री. सुरेश लाड,श्री. मिनाथ लेवे श्री. अरविंद सूर्यवंशी,श्री. आकाश जाधव,श्री. हेमंत शिंदे,मधुकर शिंदे,श्री. महेश वायफळकर मिटींगच्या चर्चा मध्ये भाग घेऊन  ठराव मंजूर करण्यात आले. श्री. निखिल जाधव साहेब. 
राष्ट्रीय युवा अध्यक्ष भाषणामध्ये नाशिक जिल्हा मांडण्यात आलेले विषय शासन दरबारी सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच आपला समाज भटक्या विमुक्त प्रवर्गातुन ST याप्रवर्गात समाविष्ट करणेबाबतच्या मागणी  संदर्भात तसेच नाथ समाजातील हुशार विद्यार्थी महाराष्ट्रातील मुंबई,  पुणे,नाशिक या  मध्यवर्ती ठिकाणी वस्तीगृह साठी योग्य नियोजन करण्यासंबंधी चर्चा करुन पाठपुरावा करुन तसेच समाजातील लोक देवदर्शनासाठी  कोल्हापुर,सोलापूर,पंढरपुर या ठिकाणी दर्शनासाठी जातात या ठिकाणी राहण्यासाठी निवास स्थानासाठी जागा बघणे. असे आश्वासन देण्यात आले. वरील सर्व मिटींग खेळी मेळीच्या वातावरण पार पाडल

Post a Comment

0 Comments