सोलापूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पदवीधरसाठी ७.६९ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी १२.३३ टक्के मतदान


सोलापूर/प्रतिनिधी:

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासामध्ये सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघात एकूण ७.६९ टक्के तर शिक्षक मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातून १२.३३ टक्के  मतदान झाले आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात पदवीधर अपेक्षा शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे.


विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ

सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघ मतदान एकूण मतदान केंद्रे: १२३
पुरुष पदवीधर मतदार: ४२०७०
स्त्री पदवीधर मतदार: ११७४२
इतर (TG) पदवीधर मतदार: १
एकूण पदवीधर मतदार: ५३८१३

सकाळी ८ ते १० या कालावधीत  झालेले मतदान
पुरुष: ३५७९
स्त्री: ५५९
एकूण : ४१३८
 मतदान टक्केवारी : ७.७९%

शिक्षक मतदारसंघ  एकूण मतदान केंद्रे: ७४
पुरुष शिक्षक मतदार: १०५६१
स्त्री शिक्षक मतदार : ३०२३
एकूण शिक्षक मतदार: १३५८४
सकाळी ८ ते १० कालावधीत झालेले मतदान
पुरुष: १४८७
स्त्री: १८८
एकूण : १६७५
मतदान टक्केवारी : १२.३३%

Post a Comment

0 Comments