मध्यप्रदेशात भाजपची सरशी …मध्यप्रदेश पोट निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून राहिले होते. २८जागांसाठी झालेल्या निवडणूकित काँग्रेसला आठ जागांवर आघाडी आहे. तर भाजपनं १९ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळं भाजप म्हणजेच शिवराज सरकार मजबूत होण्याकडे वाटचाल करत आहेत. एका जागेवर बीएसपी आघाडीवर असल्याची माहिती आहे.

आतापर्यंतच्या कलांमध्ये १९ जागांवर आघाडी, या निकालानं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी निकाल पाहात असतानाची काही छायाचित्र देखील शेअर केली आहेत. राज्याच्या जनतेनं एकदा पुन्हा विकास आणि जनकल्याणासाठी संकल्प केलेल्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी सोपवली आहे.

Post a Comment

0 Comments