राज्यातील ग्रामीण भागात ९ लाख घरे बांधणार: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसांत ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करू अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
(Advertise)

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात २८ फेब्रुवारी २०२१  पर्यंत ‘‘महाआवास अभियान-ग्रामीण’’ राबविले जाणार . 
(Advertise)

केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण १६ लाख २५ हजार ६१५ इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे 
(Advertise)

दरम्यान राज्यात सध्या अपूर्ण असलेली तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसांत ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील
(Advertise)

तसे शासनामार्फत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत सर्वसाधारण क्षेत्राकरिता १ लाख २० हजार रुपये तर  डोंगराळ, नक्षलग्रस्त क्षेत्राकरिता १ लाख ३० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते , तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपये अनुदान मिळते
(Advertise)

दरम्यान आता लाभार्थ्यांना दर्जेदार घर बांधता यावे म्हणून नियमित अनुदानाव्यतिरिक्त बँकेमार्फत ७० हजारांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments