निवडणुकीमुळे आजपासून तीन दिवस मद्यविक्री बंद; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


सोलापूर/प्रतिनिधी:

जिल्ह्यात तीन दिवस विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दि. १ डिसेंबर २०२० रोजी असून निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी रविवार दि. २९नोव्हेंबर २०२० च्या सायंकाळी ५वाजेपासून ते१ डिसेंबर २०२० च्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

(Advertise)

निवडणूक कालावधीत लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये मद्यविक्री बंदी म्हणजेच कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. नियम १९६९मधील ९(ए) (२) (सी) (१) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्वएफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४,एफएलडब्ल्यू-२, ई-२, एएफएलबीआर-२ सीएल-२, सीएल-३आदी सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या (दारूविक्री दुकाने) पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Post a Comment

0 Comments