करमाळ्यात शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान जयंती साजरी


करमाळा/प्रतिनिधी:
           
 करमाळा शहरातील गवंडी गल्ली येथे आज हजरत टिपु सुलतान यांच्या प्रतिमेस नगरसेवक अतुल फंड, बोरगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच विनय ननवरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करून सोशल डिसटेंशन ठेवून जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी टायगर ग्रुप चे संस्थापक जालिंदर जाधव, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कलीम काझी, भाजप चे सुरज शेख, ईमतयाज पठाण, अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, नगरसेवक श्रेणीक खाटेर, आयोजक अझहरभाई शेख आमीन बेग आदी जण उपस्थित होते.
(Advertise)

यावेळी नगरसेवक फंड यांनी सांगितले, की सर्व प्रथम दक्षिण भारतातील शेर ए म्हैसूर चे राजे हजरत  टिपू सुलतान यांनी वयाच्या केवळ अठराव्या वर्षी  इंग्रजा विरोधात आवाज उठवला. त्याच्या विरोधात लढाई केली इंग्रजांशी कधी ही तडजोड केली नाही, ते सर्व धर्म समभाव चे प्रतिक होते असे ते म्हणाले.

(Advertise)

यावेळी टिपू सुलतान जयंती साजरी करण्यासाठी हजरत टिपू सुलतान रह बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुफरान शेख, अमजद शेख, साजीद बिल्डर, युसूफ शेख, जावेद झारेकरी, जिशान शेख, आरिफ खान, सोहेल पठाण 
आदी जणानी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments