राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट ; सोशल मीडियावर ही भेट होत आहे ट्रोल


राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिवाळीनिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवगंध हे पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांना भेट म्हणून दिले.
(Advertise)

 तसेच बाबासाहेब पुरंदरे यांनी खासदार कोल्हे यांना छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हे पुस्तक दिवाळी भेट म्हणून दिले.
(Advertise)

आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले, असे कोल्हे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे. तसेच यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आल्याचे देखील ते म्हणाले.
(Advertise)

फेसबुक पोस्ट आणि ट्विट करत अमोल कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र कोल्हेंनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतल्याने लोकं संतापली आहेत. सोशल मिडीयावर कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटल्याचे दिसतं आहे.
(Advertise)

‘डॉ. अमोल कोल्हे साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. नुसता अभिनय करू नका,इतिहास वाचून समजून घ्या.आणि खलनायक ओळखायला शिका.’
(Advertise)

‘डॉक्टर साहेब चुकीच्या माणसाची भेट घेतलीत आई जिजाऊंची बदनामी करणारी माणसं तुमच्यासाठी आदरणीय असतील आमच्यासाठी नाहीत… चुकलात तुम्ही डॉक्टर साहेब.’

Post a Comment

0 Comments