"महाराष्ट्रातील सरकार एक दिवशी त्यांच्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल" - देवेंद्र फडणवीस


बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. यावेळी भाजपाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती.

या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल त्यांची भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराकडे लक्ष ठेवत नाही. राज्यातील सरकार एक दिवशी त्यांच्याच ओझ्यामुळे कोलमडून पडणार आहे. कारण असं सरकार फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ.”

दरम्यान बिहारमधील विजयानंतर आता महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल, असं ट्विट काल भाजप आमदार नितेश राणेंनी केलं होतं.

Post a Comment

0 Comments