करमाळा! पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अरविंद काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


करमाळा/प्रतिनिधी:

पुणे पदवीधर मतदार संघातून करमाळा तालुक्यातील झरे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद मारुती काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा सर्व पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती जमातीसाठी त्यांनी पदवीधरांसाठी आंदोलन, नोकरी महोत्सव, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांचा सर्व समाजातील नेत्यांरोबर दांडगा संपर्क आहे.
(Advertise)

वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आज पर्यंत लोकांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत, पदवीधरांचे प्रश्न, तरुणांच्या समस्या रोजगार बेरोजगारी यासारख्या अनेक समस्येवर त्यांनी अनेक वेळा सरकार विरोधात आवाज उठवला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
(Advertise)
पुणे पदवीधर मतदार संघातील मतदारांच्या आशीर्वादावर त्यांनी पुणे मधील गुरुवार दि १२ रोजी  पुणे आयुक्तालय अर्ज दाखल केला, आहे सर्व स्तरातून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे, मतदारांच्या विश्वासावर हे निवडणूक लढवत आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद काळे यांनी "लोकवार्ता"शी व्यक्त बोलताना केली.

Post a Comment

0 Comments