एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण ठीक आहे निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचा ज्यापद्धतीने पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा मिळाल्यानंतर जे काही नैराश्य आलं त्या नैराश्यातून हे सर्व होत आहे, असं पवार म्हणाले.
माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन असं सांगितलं होतं आणि काल परवा असंच काहीसं सांगितलं आहे. ठीक आहे त्यांच्याकडे बारकाईने लोक लक्ष देतात. अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल असा टोला पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
तसेच आपल्याला सत्ता मिळणार नाही यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय.
0 Comments