मुंबई पालिकेला कोर्टाचा दणका, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई बेकायदेशीर


अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने केलेली कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध असल्याच म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे.

 कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला आहे. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.

कंगनाला दिलेली नोटीस अवैध आहे. त्याविषयी महापालिकेला भरपाई करावी लागेल. नुकसानीचे मूल्यमापन नंतर केले जाईल आणि त्याविषयीनंतर निर्णय दिला.

 मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे, असं मतही न्यायाधिशांनी नोंदवलं आहे. त्यामुळे महापालिकेला कंगनाला भरपाई द्यावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments