“नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल”


नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीआहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या १४ सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. 
(Advertise)

 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे. भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो असं देखील सिन्हा यांनी म्हटलं आहे.
(Advertise)

यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल” असं म्हटलं आहे. 
(Advertise)

तसेच “आपण मुख्यमंत्री बनणार नाही असं नितीश कुमार एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर म्हटलं होतं. मात्र मित्रपक्षांच्या आग्रहानंतर ते तयार झाले. भाजपाला सर्वाधिक जागा आल्याने त्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनावे, असे आपल्याला वाटत असल्याचे नितीश कुमार यांचे म्हणणे होते.

Post a Comment

0 Comments