राज्यात सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफ आर पी देण्याचे जाहीर केले आहे.
अद्याप सोलापूर जिल्ह्यातील कारखाने गप्प बसले आहेत, हंगाम चालू होऊन महिना झाला. तरी कोणीही ऊस बिले जाहीर करून बिले काढली नाहीत, भूलथापा देऊन शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी जात आहे.
१४ दिवसांच्या आत बिल देणे बंधनकारक असताना बिले देण्यास चालढकल केली जात आहे, तरी या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाचा भडका उडवून देईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी दिला आहे.
0 Comments