दोन दिवसात कागदपत्रांसह एकनाथ खडसे करणार धमाका, कोणाच्या अडचणी वाढणार ?


भाईचंद हिराचंद रायसोनी कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी संस्था आर्थिक देवाण-घेवाण प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात अद्याप बोलणे उचित नाही. आपल्याकडे या विषयी कागदपत्रे आणि पत्रव्यवहार असून दोन दिवसात आपण खुलासा करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

(Advertise)

या प्रकरणात संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात विकत घेतलेल्या आमदार, खासदार आणि माजी मंत्री यांची पण माहिती असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणात वक्तव्य करून एकनाथ खडसे कोणाच्या अडचणी वाढवणार अशी चर्चा सुरु झालेली आहे.

(Advertise)

बीएचआर संस्थेची अपहार, गुंतवणूकदार यांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री घेणे या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. या संदर्भात खडसे यांना विचारले असता आपण राज्य सरकारकडे २०१८ पासूनच अनेक तक्रारी केल्या आहेत. तसेच आधीच्या राज्य सरकारने या संबंधित चौकशी थांबवल्याचा सुद्धा आरोप खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता.

Post a Comment

0 Comments