चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स गुणतालिकेतील स्थिती फारशी वेगळी नाही. दोन्ही संघ केवळ ३ विजयांसह ६ गुण कमावून सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. त्यामुळे बाद फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यकच आहे.
सध्या तरी चेन्नई आणि राजस्थान या संघांना अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आलेले आहे. राजस्थानच्या संघाने सुरूवात खूप चांगली केली होती, पण दोन-सामन्यांनंतर त्यांची गाडी रूळावरून घसरली. चेन्नईच्या संघाच्या कामगिरीतही फारसा फरक नाही. पण या सामन्यात CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीने रचलेला इतिहास..
या सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. या आधी कोणत्याही खेळाडूला हा पराक्रम करणं शक्य झालं नव्हतं.
0 Comments