महाराष्ट्रात येत्या ५ ऑक्टोबरपासून उपहारगृहे, बार सुरु; नियमावली जाहीर


उपहारगृहांचा दरवाजा ग्राहकांनी नव्हेतर कर्मचारीच उघडवावा.प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझरची सोय करण्यात यावी. प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग केली जावी. ग्राहकाला करोनाची लक्षणे आहेत का नाही? याची पडताळणी करणे गरजेचे आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देता येणार आहे.

ग्राहकाना सेवा पुरवत असताना सोशल डिस्टन्सिंग पालन करणे आवश्यक आहे.शक्यतो एसीचा वापर टाळावा. आवश्यकता असल्यास सतत त्यांची सफाई करत राहावी.
 हॉटेल, उपहारगृहांमध्ये आलेल्या ग्राहकांची नोंद ठेवावी लागणार आहे

ग्राहकांना मास्क घालणे बंधनकारक असून केवळ अन्नपदार्थांचे सेवन करतानाच मास्क काढण्याची परवानगी असणार आहे.उपहारगृहे, हॉटेल आणि बारमालकांनी जास्तीत जास्त डिजिटल पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करावी.शौचालय किंवा हात धुण्याच्या जागेवर कायम स्वच्छता ठेवावी.

कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी वैद्यकीय तपासणी अथवा करोनाची चाचणी करणे आवश्यक असेल. गरज भासल्यास करोनाच्या मदत संपर्क केंद्रावर संपर्क साधावा. बसण्यापूर्वी टेबलवर कोणत्याही प्लेट, ग्लास, मेन्यू कार्ड, टेबल टॉबल टॉप अथवा कोणत्याही वस्तू असू नयेत. कापडाच्या नॅपकिन ऐवजी विघटनशील कपड्याचा वापर करावा. डिजिटल पद्धतीच्या मेन्यू कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.

कर्मचारी आणि ग्राहक यांच्या शक्यतो कमी संपर्क असावा.
 मुंबईत हॉटेल उपहारगृहे सुरू झाल्यानंतर जाण्यापूर्वी आपली नोंदणी करणे आवश्यक असेल. ठराविक संख्येपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा. दोन टेबलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात गरजेचे आहे.

टेबल आणि किचनची सातत्याने आणि वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे.सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी जमिनीवरही खुणा करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments