डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज जयसिंगपूरच्या प्राध्यापकांच्या आंदोलनास न्याय देण्यासाठी मनसेच्या वतीने व्यवस्थापनाला दिले निवेदन"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

सुटा प्रणित सुरू असलेल्या डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, जयसिंगपूरच्या प्राध्यापकांचे अकरा महिन्याचे थकित वेतन व अन्य शैक्षणिक मागण्या यासाठी गेल्या ६७ दिवसापासून साखळी उपोषण व २ ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलन सुरू आहे.आजपर्यंत सुटा व व्यवस्थापन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाल्या नसल्यामुळे व वेळोवेळी व्यवस्थापनाकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने तसेच त्यांच्याकडून प्राध्यापकाविषयी दिशाभूल करणारे माहिती अनेक घटकांना देण्यात येत असल्यामुळे प्राध्यापक खूप नाराज आहेत.

 त्यामुळे मगदूम कॉलेज प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष  श्री.भगवंत जांभळे व मनसे पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनाची सद्यस्थिती यासंदर्भात  माहिती देऊन आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन केले.  मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी व निवेदन याचा सारासार विचार करून आंदोलनास  पाठिंबा जाहीर करून व न्याय देण्याचा निर्णय घेतला. शिरोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना  अर्थात मनसे यांनी डॉ.जे.जे मगदूम कॉलेज ऑफ जयसिंगपूर, ट्रस्ट प्रमुख मा.श्री.विजयकुमार मगदूम यांना प्रत्यक्ष भेटून प्राध्यापकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसात यांच्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासित  मगदूम यांनी केले.या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री. भगवंत जांभळे यांनी आपले मत व्यक्त केले.
     
या  प्रसंगी जिल्हा संघटक वाहतूक सेना श्री.संजय भंडारे, शिरोळ तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.योगेश कोळेकर, शिरोळ तालुका अध्यक्ष श्री. गजानन जाधव,जयसिंगपूर शहर अध्यक्ष श्री.निलेश भिसे, उपाध्यक्ष श्री अमित पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष श्री.अवधूत तांदळे त्याच बरोबर मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments