लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, त्यामुळेच मी बेनेडिक्टशी लग्न केलं, असा अजब खुलासा अभिनेत्री राधिका आपटेनं केला.
या मुलाखतीत विक्रांतने राधिकाला लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, “लग्न केल्यामुळे व्हिसा मिळणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केलं. कारण आम्हा दोघांना एकत्र राहायचं होतं आणि मला व्हिसा मिळत नव्हता. माझा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही. पण लग्न केल्यामुळे मला व्हिसा सहज मिळाला.”
राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनमध्येच असून कामापासूनच तिने वर्षभर ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिने स्क्रिन शेअर केला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
0 Comments