करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस तालुका/शहर कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी निवडीचे पत्र करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे,राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश बनसोडे-पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष आप्पासाहेब आहेरकर,युवा नेते आशपाक(भाई)जमादार उपस्थित होते.
यामध्ये नवीन पदाधिकारी शहराध्यक्ष विवेक लोहार,तालुका सचिव साईनाथ बोरकर, तालुका उपाध्यक्ष करण सरडे,तालुका उपाध्यक्ष अनिकेत राखुंडे,तालुका उपाध्यक्ष पृथ्वीराज राऊत,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख मदन बदे, संघटक संग्राम सिंह पायघान यांची नियुक्ती करण्यात आली.
0 Comments