बार्शी टेक्सटाईल मिल लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद आहे. त्यामुळे, ही मिल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करत खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृतीजी इरानी यांना पत्र दिले आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र व्यवहार करून मिल सुरू करण्याची मागणी केली आहे. तर, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानींना पत्र लिहले आहे. सध्या, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार महोदय दिल्लीतच आहेत. दरम्यान, माजी मंत्री दिलीप सोपल यांनीही संबंधित मंत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे.
मिल बंद असल्याने कित्येक कामगार इंडस्ट्री इस्टेटमध्ये कामाला जात आहेत, कुणी बिगारी काम करत आहे. तर कुणी मार्केट यार्डात कामाला जातंय. कुणी लहानमोठे व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. मिलमध्ये ४०० पेक्षा जास्त कामगारही आहेत, त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून आहे. पण, मिल बंद झाल्याने त्यांच्यावरही मोठं संकट कोसळलं आहे. त्यामुळे, लवकरात लवकर मिल सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे
0 Comments