सावधान सॅनिटायझरचा अतिवापर हा धोकादायकच...


मुंबई : कोरोना व्हायरसपासून  बचाव करण्यासाठी साबणाने हात धुण्याचा किंवा सॅनिटायझर  वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत. असं वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, आता केंद्र सरकारनेही नागरिकांना याबाबत सावध केलं आहे.

हँड सॅनिटायझरचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. सॅनिटायझरपेक्षा साबणाचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. सॅनिटायझर वापरणं एका ठराविक मर्यादेपर्यंत योग्य आहे. मात्र जर तुम्हाला सतत सॅनिटायझर वापरायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण सॅनिटायझरचा अति वापर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रणं देतो. याच्या अतिवापरानं तुम्हाला त्वचेचे रोग होऊ शकतात. जसे की त्वचेवर चट्टे उठणे, जळजळ होणे तसेच यामुळे तुमच्या स्नायूमध्येही समस्या निर्माण होऊ शकते

जर सॅनिटायझर वापरावे लागतच असेल, तर हँड ग्लोव्हज वापरा आणि तेच वारंवार सॅनिटाइज करा. त्यामुळे सॅनिटायझरचा साइड इफेक्ट  होणार नाही. परंतु, त्यासाठी ब्रँडेड सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे, असे त्वचाविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments