करमाळा/प्रतिनिधी:
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सकल मराठा समाज करमाळाच्या वतीने सोमवारी करमाळा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मराठा आरक्षणाला अंतरिम बंदी घालण्यात आली आहे. २०२०-२१ या वर्षामध्ये मराठा आरक्षण उपलब्ध होणार नसून, आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असल्याने या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार करमाळा यांना निवेदन देण्यात आले, आमच्या मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले.
0 Comments