उत्तरप्रदेश मध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार; रेप करून दलित मुलीचे पाय तोडले


उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना ताजी असताना आता यूपीत आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार करून तिचे पाय तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले. यानंतर या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असं गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. या प्रकरणातील एका आरोपीचे नाव शाहिद आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीचे राहणारे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.


 

Post a Comment

0 Comments