सोलापूर,दि.२३: कोरोनाचा वाढता कहर चालू आहे,वाढती गरज लक्षात घेऊन कुर्डुवाडी येथील आधार हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते आणि प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी सुविधां आहेत. येथे २४ तास सशुल्क सेवा उपलब्ध असेल, असे डॉ.आशिष शहा आणि डॉ.संतोष सुर्वे यांनी सांगितले हॉस्पिटलमध्ये १२ ऑक्सिजनयुक्त आयसीयू बेड, जनरल वॉर्ड आणि स्वतंत्र रुमची सुविधा आहे. हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी ५५ रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे.
__________________________________________
_______________________________________
यावेळी डॉ.संतोष अडगळे, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.लकी दोशी, डॉ.अभिजित नामदे, डॉ.बाहुबली दोशी आदी उपस्थित होते.
0 Comments