राकेश करमळकर/आजरा:
आजरा तालुक्यातील चव्हाण वाडी येथे सरकारी रेशन धान्य दुकानदार आस मारहाण केल्याबद्दल आजरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चव्हाण वाडी येथील सरकारी रेशन धान्य दुकानदार मारूती गोरे यांच्याकडे माहिती मागायला गेले असता माहिती नंतर देतो असे सांगितले म्हणून प्रकाश मारुती चव्हाण, शांताराम गंगाराम चव्हाण, धनाजी ईश्वर चव्हाण, संतोष बाळू चोरगे, रमेश शामराव चव्हाण, सुरेश परसू हसबे, सुखदेव मारुती चव्हाण, किरण विष्णू कोकाटे, राजेंद्र जानबा चव्हाण यांनी मारहाण केली म्हणून नऊ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वरणे करत आहेत.
0 Comments