" ......जर आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती”


शिवसेना आणि अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने कंगणाच्या कार्यालायावर कारवाई केल्यावर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका झाली होती.

ते प्रकरण कुठे शांत नाही झालं तर कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे शिवसेनेवर अजुनही टीका होत आहे. अशातच अभिनेत्री रतन राजपूतने माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणाचा संताप व्यक्त केला आहे.

लाजिरवाणा, भीतीदायक आणि निराशजनक..  जर आज आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे असते तर अशी घटना घडलीच नसती. आम्ही खऱ्या वाघाला मिस करतोय, असं रतन राजपूतने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने एक पोस्ट केली आहे. रतनची पोस्ट सोशल मीडियावर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी पाठींबा दिला आहे तर काहींनी म्हटलं आहे की, कंगणाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं हे नाही दिसलं वाटतं.

Post a Comment

0 Comments