शरद पवार यांची मोठी खेळी ? महामंडळा द्वारे राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग ?


महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा पासुनच निवडणुकी पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले आमदार हे परत राष्ट्रवादीत येणार उत्सुक असल्याचे सांगितले जाते आहे. आणि यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेल्या महामंडळा स्थान देऊन भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आपल्या कडे घेण्याचा प्रयत्न सुध्दा सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यात भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते सुध्दा सामील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, आणि जे निवडणुकी पुर्वी गेलेल्या बरेच नेते मंडळी असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील काही नेते मंडळी हे संपर्कात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते.

आणि आता यालाच दुजोरा दिला, तो म्हणजे राष्टवादी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकार मधील नवाब मलिक यांनी यांचे कारण म्हणजे नवाब मलिक म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे तब्बल बारा आमदार राष्टवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. शिवसेनेचे ह्याच्यावर बारीक लक्ष असून संजय राऊत कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments