राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र शरद पवार यांच्यासमोर 'त्या' शेतकरी पुत्रांने मांडली व्यता....


बार्शी/प्रतिनिधी;

केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागणाऱ्या शेतकऱ्यांला राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेउन विरेश 
आंधळकर या युवा शेतकऱ्यांना वेळ देत त्यांचे गाऱ्हाणे एकूण घेतले आहे. त्यांचेसोबत कांदा शेतकऱ्यांची मुले असणारे बार्शी तालुक्यातील विरेश आंधळकर, पंकज चिवटे व निखिल सातपुते यांनी आज पंढरपूर येथे खा शरद पवार यांची भेट घेत कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या, यावेळी पवार यांनी सविस्तरपणे एकूण घेत सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे २९ सप्टेबर रोजी एकदिवशी पंढरपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी या युवा शेतकऱ्यांच्या व्यता जाणून घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
__________________________________________
📢
 
(Advertise)
__________________________________________
युवा शेतकऱ्यांने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले, मी विरेश आंधळकर सौंदरे (बार्शी, सोलापूर) गावचा रहिवासी आहे. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये मला गावी परतावे लागले. ही केवळ माझी एकट्याची परिस्थिती नसून शहरामध्ये काम करणाऱ्या व शिकणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांना आता गावाकडे परतावे लागले आहे. त्यामुळे आता वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. या सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी, कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा, अशी विनंती विरेश आंधळकर याने राज्यपालांकडे केली होती. मात्र राज्यपाल भवनाकडून कोणतीही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने विरेश आंधळकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपला मागण्याचे निवेदन दिले.
   
नैसर्गिक संकट, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची मुले म्हणून आम्ही यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पंढरपूर येथे भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा झाली. साहेबांनी देखील दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले असल्याचं विरेश आंधळकर यांनी सांगितले. 

दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शेतकरी पुत्रांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. रोहित यांनी ट्विटकरत 'महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास असल्याचं म्हंटल होत.

Post a Comment

0 Comments