मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करा; शिवसेना खासदाराचे भाजप खासदाराला साकडे


शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वेगळी मागणी केली आहे. मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावं, अशी मागणी ओमराजे यांनी केली आहे. ओमराजे यांनी थेट भाजपच्या खासदारालाच मराठा आरक्षण लढ्याची गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी शेवाळे यांनी संभाजीराजे यांना निवेदन देऊन मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करण्याची विनंती केली. तसेच, या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंतीही ओमराजे यांनी संभााजीराजे यांना केली आहे.


Post a Comment

0 Comments