भाजप आजरा तालुकाप्रमुख सुधीर कुंभार वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपंचायतीस मेडिकल किटचे वाटप...


राकेश करमळकर/आजरा;

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजरा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुधीर कुंभार यांनी सामाजिक बांधिलकीचे भान राखत आजरा नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मेडिकल किट चे वाटप केले. यामध्ये एन ९५ मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, ऑक्समिटर, आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या अशा साहित्याचा समावेश आहे. सध्या नगरपंचायती तर्फेसुरू असलेल्या सर्वे साठी  कर्मचारी यांना अत्यंत उपयोग होणार आहे. याप्रसंगी अण्णाभाऊ समुहाचे प्रमुख व भाजपचे आघाडीप्रमुख अशोकअण्णा चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेवक धनाजी परपोलकरं, अशोक पोवार, मुख्य अधिकारी अजिंक्य पाटील, मयुर कुंभार, रामदास मिसाळ, कुमार नूलकर , नाथ देसाई इत्यादी मंडळी उपस्थित होती.
      
सध्या सर्वत्र कोरोना सदृश्य स्थिती असल्यामुळे यावर्षीचा वाढदिवस त्यांनी साध्या पद्धतीने साजरा केला. त्यांचे वडील कै.बाबुरावजी कुंभार यांनी ज्याप्रमाणे समाजकार्य केले होते,त्याला साजेसे कार्य आपण  यापुढील कालखंडात सुद्धा करत राहणार असल्याची  ग्वाही त्यांनी लोकावार्ताशी बोलताना दिली आहे. आजच्या वाढदिवसा दिनी सुधीर कुंभार यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात विविध सामाजिक, राजकीय स्तरातील मंडळींनी शुभेच्छा दिल्या,लोकवार्ता व आजरा पत्रकार संघाच्या मार्फत ही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments