बार्शीच्या तरुणांनं केलं 'प्लाझ्मा दान' सोलापूर जिल्ह्यातील पहिला डोनर....


बार्शी : सध्या कोरोना कहर चालूच आहे, उपचारासाठी आवश्यक असलेल्या बाधितासाठी दिलासादायक व उपयुक्त असलेल्या प्लाझमा थेरेपीसाठी कोरोनावर यशस्वीरित्या उपचार घेतलेल्या बार्शीतील  एका सव्वीस वर्षीय तरूणाने  बार्शीच्या  इंडीयन रेडक्रॉस सोसायटी संचलीत श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी या प्लाझमा थेरेपीसाठी अधिकृत मान्यता मिळालेल्या संस्थेत जाऊन प्लाझमा दान केला. 

कोरोना बाधितासाठी प्लाझमा दान करणारा अभिषेक शेटे हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील पहिला डोनर ठरला आहे. यासह तौफिक दिलावर बागवान यानेही प्लाझमा दान केलं आहे.

त्यानुसार अभिषेक शेटे या तरूणाने बुधवारी दुपारी रक्तपेढीत येऊन प्लाझमा दान केले. यावेळी रक्तपेढीच्या वतीने शेटे याचा बार्शी नगपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी रक्तपेढीचे प्रमुख डॉ.रामचंद्र जगताप, बार्शी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.शीतल बोपलकर, बार्शी तालुका वैद्यकिय अधिकारी अशोक ढगे (प्रभारी अधिकारी), डॉ.अजित तोरड, डॉ लुकडे रक्तपेढीचे व्यवस्थापक प्रशांत बुडूख व कर्मचारी उपस्थित होते. 

सुमारे दीड महिन्यापूर्वी अभिजित शेटे या तरूणाने कोरोनावर योग्य उपचार घेत यशस्वीरित्या मात केली होती. ठणठणीत बरा झाल्यानंतर त्याने रक्तपेढीच्या प्लाझमा दान करण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वखुशीने रक्तपेढीत येऊन सुमारे अर्धा तासाच्या सर्वत्या वैद्यकिय तपासण्या व  प्रक्रियेनंतर प्लाझमा दान करत कोरोना बाधितांच्या जीवनात आशेचा नवी किरण जागवला आहे.  यावेळी बोलताना मुख्याधिकारी दगडे पाटील म्हणाल्या, बार्शीच्या रामभाई शाह रक्तपेढीला प्लाझमा संकलन करण्याची अधिकृत मान्यता मिळाली आहे. याचा लाभ घेत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णासाठी प्लाझमा दात्यांनी पुढे यावे. त्याचा फायदा कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार करताना होणार आहे. 

Post a Comment

0 Comments