थेरगाव येथील एका सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट वर छापा टाकून वाकड पोलिसांनी सहा तरुणींची सुटका केली. तर दोन महिलांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दोन महिला आणि दलाल सचिन अशोक खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षकांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांना थेरगाव येथील एका सोसायटीत सेक्स रॅकेट सुरू असून दोन महिला आणि दलाल हे फोनद्वारे चॅटिंग करुन लोकांशी संपर्क करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा घालून सहा तरुणींची सुटका केली. तसेच त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या दोन महिला आणि दलाल सचिन खंडागळे यांना अटक केली.
0 Comments