सिरसाव/प्रतिनिधी;
सिरसाव मधील ९२ व्यक्तीच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी तब्बल २६ जणांना कोरोनाची बाधा झाली, ग्रामीण भागात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने बाधित सापडल्याने गावांची स्थिती चिंताजनक बनत आहे.
आजपर्यंत गावातील एकूण ४१ जनाला कोरोना ची लागण झाली असून त्यातील १ मयत आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सिरसाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.
0 Comments