वाठार मध्ये आज तब्बल दहा जण कोरोना पॉझिटिव्ह


लाजरस कदम/ वाठार:

हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये आज दहा जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत .
 
दोन दिवसांपूर्वी ज्या व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, आज त्यांच्याच घरातील ५ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्या एका घरातील ४ जणांचे  आज कोरोणा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आले आहेत, अजून एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे, असे एकूण १० जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तसेच त्यांच्या घरातील व त्याच्या संपर्कात आले होते, त्याच्या संपर्कातील सगळ्यांना क्वांरनटाईन करण्यात आले आहे.
 त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. गावातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १५  झाली आहे. त्या भागांमध्ये ग्रामपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे .गावातील नागरिकाचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments