सध्या राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे सुरू असून त्यातून ७००० क्यूसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे.तर राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ही ३७'९" इतकी असून ती इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे.जिल्ह्यातील एकूण ९४ बंधारे पाण्याखाली गेले असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तर कोयना धरणाचे ६ वक्राकार दरवाजे उघडले असून त्यातून ५५ हजार क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात येत आहे. तर वारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
नेहमी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूर येण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणातून तब्बल २ लाख क्यूसेक इतका पाणीविसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पूर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0 Comments