माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची 'कोमात'



नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली असल्याची रुग्णालयाकडून सोमवारी देण्यात आली. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाले असून गेल्या कित्येक दिवसांपासून ते कोमामध्ये आहेत. रविवारी सायंकाळपासून मुखर्जी यांची प्रकृती जास्त खराब झाली असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.  त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच्या एक दिवस आधीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मेंदूत झालेल्या गुठळ्या काढण्यासाठी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर मुखर्जी कोमात गेले होते. त्यानंतर अद्याप ते शुद्धीत आलेले नाहीत.२०१२ ते २०१७ या काळात देशाचे १३ वे राष्ट्रपती राहिलेल्या ८४ वर्षीय मुखर्जी यांची तब्येत १० ऑगस्ट रोजी बिघडली होती.

आज सोशल मिडीयावर उलट सुलट बातम्या येत आहेत. हॉस्पिटल आणि मुखर्जी यांच्या कटुंबीयांकडून या बातम्यांचे खंडण करण्यात आलं आहे. त्यांच्या मृत्यूविषयी अफवा पसरत आहेत, यावर त्यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पण फेक न्यूज पसरवू नका असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments