कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर जिल्ह्यातील ख्याती असणारे तरुण तडफदार व कार्यतत्पर आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः ऋतुराज पाटील यांनी समाजमाध्यमातून पोस्ट करत दिली आहे.
"माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी", असे अवाहन त्यांनी केले आहे.

नुकताच त्यांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी कोल्हापुरी स्टाईल मध्ये व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. तसेच नागरिकांना कोरोनाविषयी विविध पद्धतीने मदतीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. 

सध्या प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलिस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात समूह संसर्गाची स्थिती आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवी.

Post a Comment

0 Comments