बार्शी /प्रतिनिधी : तालुक्यातील खांडवी शिवारात गोडसेवाडी ते कव्हे जाणाऱ्या रस्त्याजवळ पोलिसांनी जुगार अड्डयावर शनिवारी छापा टाकून जुगार खेळणाऱ्याना ताब्यात घेतले आहे. या ताब्यात घेतलेल्या लोकांकडून सहा दुचाकी इतर जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम २३ हजार असे एकूण १ लाख ८८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी १)महेश चंद्रकांत पवार एकविराई गल्ली बार्शी २) मनोज माळी राहणार ४२२ ३)खाजाभाई शेख (राहणार ४२२) ४)प्रशांत शिवाजी जाधव राहणार बार्शी ५) मुकेश अंबऋषी भोरे, राहणार कसबा पेठ ६)अमोल सुंदरराव देशमुख (राहणार ४२२) ७)अतुल दशरथ बागल, एकविराई रोड यांचे विरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पांडुरंग सगरे, महेश डोंगरे, लोहार, केकान, शहाणे यांनी ही कारवाई पूर्ण केली.
0 Comments