राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सिल्व्हर ओकमधील २ लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी ३ लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे.
0 Comments