'रक्तदान सर्वश्रेष्ठ दानरक्त दान' ; एपीआय मंगेश साळवे


रक्तदान शिबीर भूममध्ये संपन्न

विश्वजन आरोग्य सेवा समिती व  महाराष्ट्र राज्य  विश्व मराठा संघ आयोजित यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात विद्यायक उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्य व विश्व मराठा संघ सामाजिक बांधिलकी जपली.

या वेळी शिबिराला भूम पोलीस ठाण्याचे  एपीआय मंगेश साळवे म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे मी स्वतः रक्तदान करतो व इतरांना ते करण्यासाठी प्रवृत्त करतो. यावेळी पीएसआय गडवे यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले. 

यावेळी महाराष्ट्र राज्य व विश्व मराठा संघाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष सोमनाथ कोकाटे, महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा ताई चौधरी,युवक जिल्हा अध्यक्ष अजित तांबे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष उमेश जाधव , जिल्हा युवक कायदेशीर सल्लागार अँड. योगेश पाटील व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments