मंगळवार पेठ, कोल्हापूर येथील संकल्प फाउंडेशन यांच्यातर्फे आज फ्रेंडशिप डे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व सजीवांना जगविण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या वृक्षांसोबत हा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला.संकल्प फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी निसर्गपुरक मैत्री दिन साजरा केला जातो. यावर्षीही झाडांना मैत्रीचा धागा बांधून झाडांचे महत्व सांगणारा मैत्री दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अक्षय शेळके, सुशांत चव्हाण,अमित रणदिवे,संकेत जोशी,निखिल जाधव,अभिजित चव्हाण,सतेज पोलादे,धनंजय चव्हाण उपस्थित होते.
0 Comments